भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण निर्गुण बुंथींचे आवरण । ब्रह्मा सनातन पंढरीये

sagun nirgun bunthinche avaran | brahma sanatan pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सगुण निर्गुण बुंथींचे आवरण । ब्रह्मा सनातन पंढरीये ॥१॥ तो हा श्रीहरीं नंदाचा खिल्लरी । योगी चराचरीं ध्याती जया ॥२॥ शिवाचें जेंध्येय मुनिजनांचे ध्यान । ब्रह्मा परिपूर्ण पंढरीये ॥३॥ एका जनार्दनी अठरां निराळा । लाविलासे चाळा सहां चहुसी ॥४॥