भजनी मालिका
← भजनांकडे परत

सागरींची लहरी । मी एक म्हणे सागरीं । तैसा तुझा तुंचि तुजवरी । एकदशीं

sagarinchi lahari | mi ek mhane sagarin | taisa tujha tunchi tujavari | ekadashin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सागरींची लहरी । मी एक म्हणे सागरीं । तैसा तुझा तुंचि तुजवरी । एकदशीं ॥१॥ शुद्ध आणि शबल । तुंचि एक सकळ । औटहात केवळ । ते तंव कल्पना तुझी ॥२॥ डोळे झाकून किती । पहासी आतौतें । बाहेर न करी ते वोस पाडुं ॥३॥ सबाह्म संमतु असतां वाडेंकोडें । एक देशीं थोडें कल्पनेसाठीं ॥४॥ लेंकुराचें खेळणीं । दिवस म्हणती जाली रजनी । उठती लटिके निजोनी । आतां उदयो जाला ॥५॥ तेथे अखंड प्रकाश पाहो । उदयो अस्त दोन्हीं वावो । तैसा भावो आणि अभावो । एका जनार्दन चरणीं ॥६॥