भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनें कासया करसी रे गव्हारा । चौर्‍यांयशींचा फेरा चुकवी कांहीं

sadhanen kasaya karasi re gavhara | chaur‍yanyashincha phera chukavi kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधनें कासया करसी रे गव्हारा । चौर्‍यांयशींचा फेरा चुकवी कांहीं ॥१॥ वाउगेंचि माझें म्हणोनि घेशी वोझें । आदी अंती तुझें कोण होती ॥२॥ वाउगीयाच्या छंद लागशी तूं मूढा । पतनाचा खोडा चुकवी वेगें ॥३॥ एका जनार्दनीं श्रीरंगवांचुनीं । धांवण्या धांवणीं कोण धांवे ॥४॥