भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदैव आवडे ज्यां कीर्तन । धन्य पावन जगीं ते

sadaiv avade jyan kirtan | dhanya pavan jagin te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदैव आवडे ज्यां कीर्तन । धन्य पावन जगीं ते ॥१॥ ब्रह्माचारी गृहस्थाश्रमीं । करिती कीर्तन निजधामीं ॥२॥ शुद्र अथवा अति निंद्य । कीर्तनीं वंद्य सर्वथा ॥३॥ यवन मांतगादि जन । कीर्तनीं पावन कलियुगीं ॥४॥ एका शरण जीवेंभावें । सदा कीर्तन करावें ॥५॥