भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदगुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्माप्राप्ति होय

sadagurusi sharan jay | tyasi brahmaprapti hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदगुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्माप्राप्ति होय ॥१॥ न लगे आणिक उपाव । धरी सदगुरुचे पाय ॥२॥ सदगुरुचें चरणतीर्थ । मस्तकी वंदावें पवित्र ॥३॥ एका जनार्दनीं सदगुरु । हाचि भवसिंधुचा तारु ॥४॥