भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सुरवर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रें न भजा

sada suravar sukh ten ichchhiti | aisa lakshmipati kan ren na bhaja

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा सुरवर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रें न भजा ॥१॥ सोइरा धाइरा आन दुजा नाहीं । गुरु पिता पाहीं हाचि बंधु ॥२॥ सज्जन सांगती आन नाहीं आम्हां । एका जनार्दनीं प्रेमा वसें देहीं ॥३॥