भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सर्वकाळ नाम मुखीं गाये । आणीक तें नये दुजा हेत

sada sarvakal nam mukhin gaye | anik ten naye duja het

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा सर्वकाळ नाम मुखीं गाये । आणीक तें नये दुजा हेत ॥१॥ धन्य त्याची माय पावन तें कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥ जन्मजन्मांतरींचें सुकृत पदरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं सदा जपे नाम । तो देह उत्तम इहलोकीं ॥४॥