भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सर्वकाळ बाइलेचा दास । होउनी कामास श्वान जैसा

sada sarvakal bailecha das | houni kamas shvan jaisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा सर्वकाळ बाइलेचा दास । होउनी कामास श्वान जैसा ॥१॥ नेणे भीड कधीं मर्यादा स्वजनीं । बाइलेचे कानीं गुज सांगें ॥२॥ बैसतां राउळीं बाइले एकान्त । देवापाशीं चित्त न बैसेचि ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा तो पतित । अघोर भोगीत कल्पकोडी ॥४॥