भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव

rushyamuk parvati anjani tap kari | athavila antari sadashiv

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥ तपाचिया अंती शिव जाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥ येरी म्हणे तुज ऎसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥ म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैसे माझे ध्यानीं सावधान ॥४॥ वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥ एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥