भजनी मालिका
← भजनांकडे परत

रेखिले निढळीं केशरीं टिळक । तयावरी कस्तुरी परम सुरेख । उत्तम कुंकूं जाउळीं देख । लाविलिया आरक्त अक्षता

rekhile nidhalin kesharin tilak | tayavari kasturi param surekh | uttam kunkun jaulin dekh | laviliya arakta akshata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रेखिले निढळीं केशरीं टिळक । तयावरी कस्तुरी परम सुरेख । उत्तम कुंकूं जाउळीं देख । लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥ मग तो चंदन मलयागर । चर्चिला सुवासित अति परिकर । यावरी काढुनी सुमनाहार । उभयतां कंठीं ओपिले ॥२॥ तुरे खोविले मस्तकावरी । तेणें शोभले बळरामहरी । मग ठेवूनियां चरणांवरी । मस्तक नमू उभी ठेली ॥३॥ कृष्ण बोलिले प्रसन्नोत्तर । कुब्जे तुझा केला अंगिकार । निळा म्हणे तदाकार । वृत्ति झाली कुब्जेची ॥४॥