भजनी मालिका
← भजनांकडे परत

रे मानवा उगीच आमुची जिणी

re manava ugich amuchi jini

रचनाकार: संत रामदास · अभंग
रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हा ध्यानीं भेटीची शिराणी नरापरिस वानर भले । जिहीं डोळां राम देखियेले ज्यासी रघुराज। हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटले रामीं मिनले ते असो नीच याती । त्यांच्या चरणाची वंदीन माती नित्य नव्हाळी गाउनि करुं किती । तेणे रघुनाथीं उपजेल प्रीती रामीरामदास म्हणे ऐका करु । यारे आम्ही तैसाचि भाव धरुं भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारु । तेणें आम्हां भेटेल रघुवीरु