भजनी मालिका
← भजनांकडे परत

राया जाणविती सेवक । अक्रूरें आणिला नंदबाळक । तेणं मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागही भंगिला

raya janaviti sevak | akruren anila nandabalak | tenan marduni baliya rajak | dhanuryagahi bhangila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
राया जाणविती सेवक । अक्रूरें आणिला नंदबाळक । तेणं मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागही भंगिला ॥१॥ आतां येऊनियां चौबारी । उभा रंगशिळेवरी । अवघ्या पाहाती नगरनारी । लोकपरिवारीं मिळोली ॥२॥ उभयतां बंधू अति सुंदर । बळिराम आणि सारंगधर । आणखिही गौळियांचे कुमर । सवंगडे भार पांच शतें ॥३॥ कृष्ण लावण्य रुपाकृती । चंद्रसूर्या दवडी परती । अनंग तोहि उषभूपती । ऐसें सौदर्य हरिअंगी ॥४॥ लोक मिळाले भोंवते । पाहातां धणी नपुरे त्यातें । जाऊंचि विसरले मागुते । शोधलें चित्तें हरिरुपा ॥५॥ आणिक एक वितलें राया । कुब्जे चंदने चर्चिल तया । करुनियां ते दिव्य काया । ठेविली कृष्णें क्षणार्धे ॥६॥ निळा म्हणे सांगता ऐसें । चकित रावो निज मानसे । देहीं देहातें नुमसे । चित्रींचे लेप तयापरी ॥७॥