भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्रीची प्रौढी नोहे सुर्याचा प्रकाश । तोवंरींचे भास आंधाराचा

ratrichi praudhi nohe suryacha prakash | tovanrinche bhas andharacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रात्रीची प्रौढी नोहे सुर्याचा प्रकाश । तोवंरींचे भास आंधाराचा ॥१॥ सुर्याचे उदयीं अंधार हा नासे । तैसें अज्ञानें नासे ज्ञान सर्व ॥२॥ एका जनार्दनीं सदगुरुवांचुनी । प्रकाश तो मनीं नोहे कांहीं ॥३॥