भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामें रावण रणीं । निवटिला निजबोध वाणीं । येर सर्वस्व मानुनी । निज सुखीं जाहला

ramen ravan ranin | nivatila nijabodh vanin | yer sarvasva manuni | nij sukhin jahala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामें रावण रणीं । निवटिला निजबोध वाणीं । येर सर्वस्व मानुनी । निज सुखीं जाहला ॥१॥ दहा मुखांते छेदिलें । शेखीं विश्वमुखें केलें । रणीं रामें सुख दिधलें । परम सुख ॥२॥ राम तो वैरी नव्हे राजा । सखा जिवलग माझा । दहा मुखें वीस भुजा । फ़ेडिला केरु ॥३॥ नश्वरा राज्य नेलें । रावणपण गेलें । अक्षयीं राज्य दिधलें । श्रीरघुनाथें ॥४॥ माझे देह संदेह छेदिलें । ली वेदामृत पाजिलें । ऐसें बोलतां बोलें । बोलवेना ॥५॥ राम रावण रणीं । बोधाची झोट धरणी । एका जनार्दनीं । मिनलें एकपणीं ॥६॥