भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामें अहिल्या उद्धरिली। रामें गणिका तारिली

ramen ahilya uddharili| ramen ganika tarili

रचनाकार: संत सेना · अभंग
रामें अहिल्या उद्धरिली। रामें गणिका तारिली ॥१॥ म्हणा राम श्रीराम । भवसिंधु तारक राम ॥२॥ रामें जटायु तारिलें । रामें वानरा उद्धरिलें ॥३॥ ऐसा अयोध्येचा राजा। सेना म्हणे बाप माझा॥४॥