भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामें तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी

ramanamen trupta je nar jahale | punaravrutti na ale sansarasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनामें तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी ॥१॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । रामनाम साचार जप करीं ॥२॥ अभ्राची छाया मृगजळाचें जळ । तैसा हा देह केवळ मिथ्या असे ॥३॥ मिथ्याचें सत्य मनिती गव्हार । रामनामीं विसर पडोनि ठेला ॥४॥ विसरुनी राम करिशी प्रपंच धंदा । भुललासी मतिमंदा नाशिवंता ॥५॥ नाशिवंतासाठी रडतोसी काह्मा । एका जनार्दनीं पाया शरण रिघे ॥६॥