भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामें गणिका नेली वैकुंठासी । कलीमाजीं जनांसी तारक हेंची

ramanamen ganika neli vaikunthasi | kalimajin janansi tarak henchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनामें गणिका नेली वैकुंठासी । कलीमाजीं जनांसी तारक हेंची ॥१॥ म्हणोनि आळस न करा वाचे । उच्चारण नामाचें करा वेंगीं ॥२॥ न लगे मान धन सोपें हें साधन । तुटतें पतन जन्मोजन्मीं ॥३॥ एका जनार्दनीं न करा आळस । रामनाम सौरस घ्यावें वाचे ॥४॥