भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामाची धन्य ख्याती । पापी तरले पुढें तरती

ramanamachi dhanya khyati | papi tarale pudhen tarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनामाची धन्य ख्याती । पापी तरले पुढें तरती ॥१॥ तरला कोळी अजामेळ । गणिका आणि ते सकळ ॥२॥ नामें पावन स्त्रियादी याती । नामें सर्वा एकचि मुक्ति ॥३॥ एका जनार्दनीं शरण । नामें तिहीं लोकी पावन ॥४॥