भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम वसे ज्याचे मुखीं नित्य । त्याचेनि पतीत उद्धरण

ramanam vase jyache mukhin nitya | tyacheni patit uddharan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनाम वसे ज्याचे मुखीं नित्य । त्याचेनि पतीत उद्धरण ॥१॥ रामनाम मंत्र जपे नित्यकाळ । त्यासी कळिकाळ हात जोडी ॥२॥ रामनामीं त्याची जडली चित्तवृत्ती । वृत्तीची निवृती झाली त्यासी ॥३॥ एका जनार्दनीं जपे रामनाम । तेणें पूर्ण काम स्वयें झाला ॥४॥