भजनी मालिका
← भजनांकडे परत

रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा

rama ramesh mastaki har | pudhe tir chandrabhaga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥१॥ मध्यभागीं पुंडलीक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥ बहुता वैष्णवांचा मेळ । गदरोल नामाचा ॥३॥ वामभागीं रुक्मिनी राही । जनार्दन तेथें पाहीं ॥४॥