भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची सोये । तेथें रामरावणु कोठें आहे । सांग माय यथार्थ

ram sarvanchyahrudayin ahe | dharitan tya hrudayasthachi soye | tethen ramaravanu kothen ahe | sang may yathartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची सोये । तेथें रामरावणु कोठें आहे । सांग माय यथार्थ ॥१॥ भोगितां हृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तियासी । तेथें रावण कैंचा आणिसी । जें तयासी भोगावें ॥२॥ दृश्याचिये भेटी । दृश्यपणें उठी । होता तेणेंसी तुटी । तोही शेवटीं असेना ॥३॥ आतां नाहींपण असे । असेतोचि दिसे । एका जनार्दनीं पिसें । रावणाचें कायसें ॥४॥