भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला

ram sarvaghatin vyapak sanchala | jaisa bhav taya taisa bhetala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥ रीस आणि वानर राक्षसहि पहाती । सर्वां एकची मुक्ति रामसंगे ॥२॥ वैर अथवा सख्य वाचे वदे नाम । मुक्ति आम्हां राम स्वयें देती ॥३॥ एका जनार्दनीं वदतां निष्काम । स्वर्गसुख द्त राजाराम ॥४॥