भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम रावण रणांगणीं । युद्धा मीनला नीज निर्वाणीं । येरयेरातें लक्षुणीं । स्वयें विधों पाहे

ram ravan rananganin | yuddha minala nij nirvanin | yerayeraten lakshunin | svayen vidhon pahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम रावण रणांगणीं । युद्धा मीनला नीज निर्वाणीं । येरयेरातें लक्षुणीं । स्वयें विधों पाहे ॥१॥ तंव गज ध्वजीं राम । रामाचि धनुष्यबाण । रामरुप आपण । आपणा देखें ॥२॥ रावणा पाडलें ठक । रामरुप कटक । पारिकें आणीक । तया न दिसें कांहीं ॥३॥ रामरुप नर । रामरुप वानर । वैरी निशाचर । रामरुप ॥४॥ रावण पाहे लंकेकडे । रामरुप लंकेचे हुडे । सबाह्म चहूकडे । राम दिसे ॥५॥ ऐसें निर्वाण युद्ध । विसरला द्वंद्वभेद । एका जनार्दनीं आनंद प्रगटला ॥६॥