भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें

ram ram mhanatan vache | ramarup hoy sachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें ॥१॥ रामें तारिली शबरी । नित्य राम ती उच्चारी ॥२॥ रामें तारिली गणिका । केल्या अजामेळ सखा ॥३॥ शिळा तारिल्या सागरीं । राम अहिल्या उद्धरी ॥४॥ एका जनार्दनीं । राम भरला जनीं वनीं ॥५॥