भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम राम ध्वनी जयाचे मुखासी । धन्य पुण्यराशी पावन झाला

ram ram dhvani jayache mukhasi | dhanya punyarashi pavan jhala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम राम ध्वनी जयाचे मुखासी । धन्य पुण्यराशी पावन झाला ॥१॥ सदोदित नाम जपे श्रीरामाचें । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥ राम राम वदे सादा सर्वकाळं । काळाचा तो काळ रामनामें ॥३॥ राम वदे ध्यानीं राम वदे मनीं । एका जनार्दनीं राम वदे ॥४॥