भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाईस तेव्हां म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं

rajais tevhan mhanatase nama | dainyakal amhan nahin nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राजाईस तेव्हां म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं ॥१॥ आम्ही हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी घरीं वसे ॥२॥ कृपावंतें मज नाहीं उपेक्षिलें । आम्ही का वहिले दैन्यवाणें ॥३॥ एका जनार्दनीं बोलोनियां मात । गेला राउळांत तेव्हां नामा ॥४॥