भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहिला हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं पळोनी गेलें

rahila hari lakshmisahit gharin | dainya sahaparivarin paloni gelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राहिला हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं पळोनी गेलें ॥१॥ उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥ भाजनें तीं नानापरी करी । नाटकी मुरारी चाळक जो ॥३॥ ऐसे सुखरुप राहिलें निर्धारे । न कळे विचार गोरोबासी ॥४॥ एका जनार्दनीं पुढें काय जाहलें । सर्व दैन्य गेलें गोरोबाचें ॥५॥