भजनी मालिका
← भजनांकडे परत

रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी

radati randaporen nashivantasathin | kevadhi ataati jivin hosi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी ॥१॥ कुडीसी मरण न कळेचि जाण । आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥ एका जनार्दनीं नाथिलाची भास । विठ्ठलनामें सौरस न घे कोणी ॥३॥