भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष

pushpavati chandrabhage | karitan snan bhange dosh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष ॥१॥ पाहतां पुंडलीक नयनीं । चुके जन्म नये अयनीं ॥२॥ घेतां विठ्ठलदरुशन । होती पातकी पावन ॥३॥ करितां प्रदक्षिना । पुन्हा जन्म नाहीं जांणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । कळस पाहतां मुक्त जाण ॥५॥