भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हां मार्ग

purvichiya matantara | sampadala bara amhan marga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हां मार्ग ॥१॥ नाहीं कोठें गोंवा गुंतीं । ऐसें गर्जती हरिदास ॥२॥ वाचें नाम करें टाळी । साधन कली उत्तम हें ॥३॥ धालों कीर्तनीं प्रेमानंदें । वाचें आनंदें गाऊं गीत ॥४॥ एका जनार्दनीं धरली कास । नाहें आस दुसरी ॥५॥