भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुर्वपुण्य असतां गांठीं । संतभेटी होय

purvapunya asatan ganthin | santabheti hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुर्वपुण्य असतां गांठीं । संतभेटी होय ॥१॥ धन्य धन्य संतसंग । फिटे तग जन्माचा ॥२॥ चार सहा वंदिती पाय पैं । आणिकां ठाव कोठें नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं संत । कृपावंत सुखासिंधु ॥४॥