भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती

purvapar parampara | sant soyara vaniti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥ सांगे कृष्ण उद्धावासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥ स्वयें नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तिचा ॥३॥ संत सनकादिक येती । भावें वंदिती श्रीचरण ॥४॥ एका जनार्दनीं वेधलें मन । नुठें बैसलें तें तेथुन ॥५॥