भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरी वास घडे

purva sukrutachi ganthodi padarin | tarich pandhari vas ghade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरी वास घडे ॥१॥ कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता ततक्षणीं ॥२॥ पृथ्वीचे दान असंख्या गोदानें । पंडलीक दरुशनें न तुळती ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ॥४॥