भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरुष अथवा नारी । नाचती कीर्तन गजरीं

purush athava nari | nachati kirtan gajarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुरुष अथवा नारी । नाचती कीर्तन गजरीं ॥१॥ तया कोनी जें हासती । त्यांचें पूर्वज नरका जाती ॥२॥ आपुली आपण । कीर्तनीं सोडवण ॥३॥ देहीं असोनी विदेहता । कीर्तनीं होय पैं तत्त्वतां ॥४॥ ऐसा कीर्तनमहिमा । एका जनार्दनीं उपमा ॥५॥