भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीक पूजा करी । विधि षोडश उपचारी

pundalik puja kari | vidhi shodash upachari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुंडलीक पूजा करी । विधि षोडश उपचारी ॥१॥ देखोनियां त्याचा भावों । उभा वैकुंठीचा रावों ॥२॥ बुका अर्पीं तुळशीमाळा । केशर चंदनाचा टिळा ॥३॥ निळा म्हणे स्थिरावला । देखोनि भक्तांतें भुलला ॥४॥