भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जाते रें जन्माचे । जिहीं देखिलें पद यांचे । धन्य भग्याचे नर ते

pundalik mhanatan vachen | pap jate ren janmache | jihin dekhilen pad yanche | dhanya bhagyache nar te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जाते रें जन्माचे । जिहीं देखिलें पद यांचे । धन्य भग्याचे नर ते ॥१॥ जाती पंढरीसी आधीं । तुटे तयांची उपाधी । ऋद्धी सिद्धी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥ भुक्ति मुक्ति धांवती मागें । आम्हां अनुसारा वेगें । ऐसें म्हणोनि वेगें । चरणीं मिठी घालिती ॥३॥ शरण एका जनार्दनीं । विटें उभा मोक्षदानी । लागतां तयांचे चरणीं । पुनरावृत्ति न येतीं ॥४॥