भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजन तो एक पुरे । वाचे स्मरे रामनाम

pujan to ek pure | vache smare ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजन तो एक पुरे । वाचे स्मरे रामनाम ॥१॥ नको गंधाक्षता तुळशी । मुखीं नाम अहर्निशीं ॥२॥ धूप दीप नैवेद्य तांबूल । सदा वाचे नाम बोल ॥३॥ आर्ती धूपार्ती अक्षता । राम गाऊं निःसीमता ॥४॥ एका जनार्दनीं शरण । सहज पूजा घडे जाण ॥५॥