भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव । भाव धरूं तरी देवचि देव

puja karun tari puje nahin thav | bhav dharun tari devachi dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव । भाव धरूं तरी देवचि देव ॥१॥ करुं तरी पूजा कवणाचि सांगा । देवाविण जागा रिती कोण ॥२॥ एका जनार्दनीं पूजेसी नाहीं ठाव । अवघा व्यापला देवाधिदेव ॥३॥