भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी

pudhen gele hariche das | tyanchi as amhansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुढें गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥ त्याची मार्गीं आम्हीं जाऊं । वाचे गाऊं विठ्ठला ॥२॥ संसाराचा न करुं धंदा । हरुषें सदा नाम गाऊं ॥३॥ एका जनार्दनीं डोळे । पहाती पाउलें कोंवळें ॥४॥