भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें गांईची खिल्लारें । मागें गोवळ आपण भारें । मुरलीवादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदे

pudhen ganichi khillaren | magen goval apan bharen | muralivadan saptasvaren | karit chalat anande

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुढें गांईची खिल्लारें । मागें गोवळ आपण भारें । मुरलीवादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदे ॥१॥ पांवयाच्या तलालोरी । डफहुडूक त्या भीतरीं । शंख कहाळा वाजवित कुसरीं । गोवळ नाचती भोंवतें ॥२॥ गाइ| चरती पांगोनी वनीं । मुख संतोष चारा वदनीं । कृष्णा दृष्टीं अवलोकुनी । तृप्त जीवनीं यथाकाळें ॥३॥ शीतळ छाया देखती जेथें । विलासे नाचत ठाकती तेथें । टिपरी रुमाल घेउनी हातें । मोडिती अंगे नानापरी ॥४॥ हुतुतु हमामा विटी दांडू । सुरकठया लगोरिया घेउनी चेंडू । झोंबिया घेऊनि दावती वाडू । आपुलिया निजशक्ति ॥५॥ नाना उमाणीं उगवितीं कोडीं । सांगती काहाण्हीया कडोविकडीं । गाणी गाती अति आवडी । करिती उध्दार रागांचे ॥६॥ निळा म्हणे माध्यान्हकाळीं बैसोनी कळंबावे तळीं । काढिल्या शिदोया माजीं वनमाळी । करिती आरोहणा स्वानंदें ॥७॥