भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण

pravruttinivruttiche atuniya bhag | utarilen chang rasayan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्रीहुतासी कडशिलें वोजा । आत्मसिध्दीकाजा लागोनियां ॥२॥ ब्रम्हरस ब्रहमीं सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतितीमुखीं ॥३॥ स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधननिजध्यास ग्रासोग्रासीं ॥४॥ आरोगयता निळा पावला आष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्मरंगें ॥५॥