भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली

prapancharachana sarvahi bhoguni tyagili | anutapache jvalin dehabudhdi havili | vairagyachi nishtha pragatuni dakhavili | ahanta mamata davaduni nijashanti varili

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥ जयजयाजी सदगुरुतुकया दातारा । तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥ हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला । विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोध्दारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥ तेरा दिवस बह्या रक्षूनियां उदकीं । कोरडयाची काढूनी दाखविल्या शेखीं । अपार कविताशक्ति मिरवुनि इहलोकीं । कीर्तनश्रवणें तुमच्या उध्दरती जन लोकीं । जय ॥३॥ बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला । विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणें ब्रहमानंदें प्रेमा डोलविला । न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला ॥ जय ॥ ॥४॥ प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले । मानवदेह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ जय ॥ ॥५॥