भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम

prapanch paramartha karin kan re sukhacha | nirantar vacha nivruttinam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥ योगयागादिक न लगे तीं साधनें । निवृत्तिनामें पेणें वैकुंठींचें ॥३॥ एका जनार्दनीं न करीं साधन । निवृत्ति म्हणतां जाण सर्व जोडे ॥४॥