भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच परमार्थ एकरुप होत । आहे ज्याचा हेत रामनामीं

prapanch paramartha ekarup hot | ahe jyacha het ramanamin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंच परमार्थ एकरुप होत । आहे ज्याचा हेत रामनामीं ॥१॥ परमर्थे साधें सहज संसार । येथेंक वेरझार नाहीं जना ॥२॥ सहज संसारें घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ॥४॥