भजनी मालिका
← भजनांकडे परत

फिरविसी मान तरी पिंग्याच्या महिमान । नाहींतरी सरे परती जाई वो येथून

phiravisi man tari pingyachya mahiman | nahintari sare parati jai vo yethun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
फिरविसी मान तरी पिंग्याच्या महिमान । नाहींतरी सरे परती जाई वो येथून ॥१॥ धरी हरि चित्तीं गे पिंगयाच्या निगुती । नाहींतरी वायां जासी भोवंडीचे भ्रांती ॥२॥ मोडशील माजगे तरीच पिंगा साजे । लाटण्याऐसी न लवतां फजितीचें भोज ॥३॥ निळा म्हणे सांगितले धरी हित कानीं । तरीच पिंगा मोड तुझा श्रीहरिचिंतनीं ॥४॥