भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायीं जडलें माझे मन । चित्त जालें समाधान

payin jadalen majhe man | chitta jalen samadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पायीं जडलें माझे मन । चित्त जालें समाधान ॥१॥ तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केलें आम्हां ॥२॥ कृपा केली तुम्हीं । लावियेलें आपुलें नामीं ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपा । तेणें मार्ग जाला सोपा ॥४॥