भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायांवरी ठेवितां भाळ । कर्म सकळ सुफळ

payanvari thevitan bhal | karma sakal suphal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पायांवरी ठेवितां भाळ । कर्म सकळ सुफळ ॥१॥ ऐसा छंद जया मनीं । धन्य जननी तयाची ॥२॥ लोटांगण संतापुढा । घाली उघडा होउनी ॥३॥ एका जनार्दनीजं भेंटीं । जन्ममरणा होय तुटीं ॥४॥