भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें

pavitra to deh sada jyacha nem | vache gay ram sarvabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें ॥१॥ धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखीं ॥२॥ करितसे कथा कीर्तनीं आवडी । ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे ॥३॥ एका जनार्दनीं धन्य तें शरीर । परमार्थ संसार एकरुप ॥४॥