भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी

pavala janan matechya udarin | santoshali mata tayasi dekhoni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥ जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥ दिवसेंदिवस वाढला सरळ फोक । परि कर्म करी अचाट तयान सहावे दुःख ॥३॥ शिकवितां नायके पडे भलते वेसनीं । एका जनार्दनीं पुन्हा पडतसे पतनीं ॥४॥