भजनी मालिका
← भजनांकडे परत

पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुम्हा कारणें उपेक्षीना

pashu ani pakshi tarale smaranen | to tumha karanen upekshina

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुम्हा कारणें उपेक्षीना ॥१॥ धरुनि विश्वास आळवावे नाम । सदगद तें प्रेम असो द्यावें ॥२॥ सुखदुःख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाहीं जगीं ॥३॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । नुरेची तेथें पाप वोखदासी ॥४॥